एकेकाळी अभिनेता इम्रान हाश्मीला ‘सिरीअल किसर’ म्हणून ओळखलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्याची प्रतिमा हळूहळू बदलताना पाहायला मिळत आहे. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटांमधून इम्रानच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहता आली. सुरुवातीच्या काळात इम्रानने त्याच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले होते. परंतु बॉलिवूडमधील तीन अभिनेत्रींसोबत तो कधीही हा सीन देणार नसल्याचं सांगितलं. या मागे त्याने काही कारणं असल्याचंही सांगितलं.

इम्रानने अभिनेत्री आलिया भट्टसोबत कधीही किसिंग सीन देणार नसल्याचं सांगितलं. यामागे चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट कारण आहेत. इम्रान आणि महेश भट्ट यांच्यात चांगली मैत्री असून महेश भट्ट यांच्या बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. महेश भट्ट यांच्यामुळेच इम्रान कलाविश्वात पदार्पण करु शकला. त्यामुळे तो महेश भट्टांचा कायम आदर करतो आणि आलियाला बहीण मानतो. आलियाला बहीण मानत असल्यामुळे तिच्यासोबत किसिंग सीन करणं योग्य नसल्याचं म्हणत त्याने तिच्यासोबत असे सीन करणार नसल्याचं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Flight for #Chehrein last schedule : Delhi , Poland . I need a gas mask for one and a thick north face jacket for the other .

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan) on

त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतसोबत देखील कधीच किसिंग सीन देणार नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं. कंगना बऱ्याच वेळा सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य, कलाकारांवर ताशेरे ओढत असते. त्यामुळे कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांसोबत तिचं जमत नाही. या यादीमध्ये इम्रान खानचंदेखील नाव येतं. कंगना आणि इम्रानमध्ये काही कारणामुळे वाद झाले होते. त्यानंतर तिच्यासोबत किसिंग सीन देणार नसल्याचं इम्रानने सांगितलं. जरीन खान आणि इम्रान एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे तिच्यासोबत किसिंग सीन देणं मला योग्य वाटत नाही. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये इम्रानची सिरीअल किसर ही प्रतिमा बदलली आहे. अलिकडेच त्याने वेबविश्वात पदार्पण केलं आहे. ‘बार्ड ऑफ ब्लड’ (Bard of Blood) ही त्याची पहिली वेब सीरिज होती.