वादग्रस्त मॉडेल सोफिया हयातने ती नन बनल्याचे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. नन झाल्यामुळे ग्लॅमरस जगाचा तिने त्याग केला असेही ती म्हणाली होती. पण आता परत ती तिच्या मूळ रुपात आल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी तिने परत तिचे बोल्ड फोटो सोशल मीडिया साइटवर टाकले होते. सोफियाने इन्ट्राग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला, ज्यात ती तिचा बोल्ड लूक दाखवताना दिसते. या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या कपड्यांमधे दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ती एका ननच्या पोशाखात दिसते तर नंतर साध्या टि-शर्टमध्ये दिसते. त्यानंतर ती डोकं पूर्णपणे झाकलेल्या अवतारात दिसते, शेवटी तर ती दाढी वाढवलेल्या एका पुरुषाच्या रुपात दिसत आहे.
याआधीहा सोफिया शंकरावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आली होती. आता नन झाल्यानंतर टाकलेल्या या फोटो आणि व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती सारखी, ‘नमस्कार मी गाया सोफिया आहे,’ असेच बोलत आहे. मधेच नन तर कधी बोल्ड अंदाज यांचे सतत फोटो, व्हिडिओ अपलोड करुन तिलाही आता परत मूळ रुपात येण्याची इच्छा होत आहे असेच वाटते. ती हे सगळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मीडियाचे लक्ष सतत तिच्यावर राहण्यासाठी करते असेही म्हटले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 3:37 pm