18 November 2017

News Flash

…म्हणून मौनी रॉयचे चाहते दुखावले

हे दोघंही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 5:59 PM

मौनी रॉय

टीव्ही जगतातील आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय हिच्याच नावाची सध्या अधिक चर्चा आहे. सुरुवातीला ‘देवों के देव महादेव’ आणि नंतर ‘नागिन’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मौनी लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमात ती दिसेल. नुकतेच तिचे या सिनेमाचे चित्रीकरण संपले असून, स्वतःसाठी वेळ काढावा म्हणून ती श्रीलंकेत गेली आहे. पण सध्या ती कोणत्याही सिनेमा अथवा मालिकेमुळे चर्चेत आली नसून, तिचे अभिनेता मोहित रैनाशी ब्रेकअप झाले असल्याच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आली आहे.

कथा पडद्यामागचीः रंगभूमीवर तुम्ही दररोज नव्याने जगत असता: आस्ताद काळे

The vacay s treating me well ! 💋 xx

A post shared by mon (@imouniroy) on

‘देवों के देव महादेव’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मौनी व मोहित यांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि त्यांच्यात हळूहळू प्रेम बहरत गेले. नंतर अनेक कार्यक्रमांत आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये या प्रेमी युगुलाला एकत्र पाहण्यात आले. पण आता त्यांच्यात पूर्वीसारखे काहीही नसल्याचे म्हटले जाते. मौनी आणि मोहित या दोघांनीही याबद्दल अधिकृत माहिती दिली नसली, तरी दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचे दिसते. त्यांनी एकमेकांना अनफॉलो का केले असेल, या प्रश्नावरुनच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनाही उधाण आले.

The wild , untamed, virgin dame …

A post shared by mon (@imouniroy) on

हे दोघंही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. आतापर्यंत दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पण आता मात्र दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले की काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. मौनीने मोहितसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावरुन डिलीटही केले आहेत. मौनी आणि मोहित यांच्यात दुरावा नेमका कोणत्या कारणामुळे आला हे मात्र अजून कळले नाही.

यापूर्वीही मोहित- मौनीच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. अर्थात त्यावेळी मोहितने त्या बातम्या म्हणजे फक्त अफवा असल्याचे म्हटले होते. ‘ती आपल्या कामात प्रचंड मेहनत घेतेय, त्यामुळे तिला तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करू द्या. तिच्या यशाचे कौतुक करायचे सोडून काही लोक तिला खाली खेचू पाहत आहेत’, असे मोहित म्हणाला होता. मोहित अशाप्रकारेच आताही मौनीच्या पाठीशी उभा असेल तर ते चांगलेच आहे. त्यामुळेच  मोहित व मौनीचे नाते तुटू नये, अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे आणि आमचीही.

First Published on September 13, 2017 5:59 pm

Web Title: shocking mouni roy and mohit raina unfollow each other on social media has the couple broken up