‘आयटम गर्ल’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली राखी सावंत सध्या चर्चेत असते ते म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा एखाद्या वादग्रस्त विधानामुळे. बऱ्याच दिवसांपासून ती कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमधून झळकली नसली तरीही तिच्याभोवती असलेलं चर्चा आणि वादांचं वलय मात्र कमी झालेले नाही. आता पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवण्यासाठी राखी सावंतने बेताल विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’ १२ च्या घरातील स्पर्धक भजन गायक अनुप जलोटा आणि जस्लीन माथुर यांच्या नात्याची खिल्ली उडविणाऱ्या राखीने नुकतचं अवयव दानाविषयी तिचं मत मांडलं आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून यात तिने अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राखीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने स्तनदान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये तिने स्तनदान का करायचे या मागील कारणही सांगितले. विशेष म्हणजे तिचे हे वक्तव्य प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलं आहे, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

‘जगात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्या इतरांसाठी आपल्या मदतीचा हात पुढे करत असतात. गरजू रुग्णांना आपले अवयवदान करुन त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात करुन देण्यास मदत करत असतात. त्यामुळेच मी देखील या गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. मी जास्त काही मदत करु शकत नाही. पण जे माझ्याकडे आहे ते मी नक्कीच देऊ शकते’, असं राखी म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘आतापर्यंत अनेकांनी डोळे , फुफ्फुस, वैगरे यासारख्या महत्वाच्या अवयवांचं दान केलं आहे. मात्र मी माझं स्तनदान करु इच्छिते.’ राखीच्या या व्हिडिओमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली असून तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, राखी अनेक वेळा तिचं मत स्पष्टपणे व्यक्त करत असते. त्यामुळे तिच्या या वक्तव्यांमुळे तिला काही वेळा ट्रोलही व्हावं लागत असतं. मात्र राखीने कायमच ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं आहे. यापूर्वीही राखीने breast enhancement surgery केल्याचं मान्य केलं होतं. मात्र त्यानंतर २०१० मध्ये तिने breast implants removed केल्याचाही दावा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking rakhi sawant wants to donate her boobs to the society in this viral video
First published on: 24-09-2018 at 09:42 IST