Advertisement

शिल्पा शेट्टीला जबर फटका! ‘सुपर डान्सर’ ठरलं कोट्यावधी नुकसानीच कारण

शिल्पा शोच्या एका एपिसोडसाठी तगडे मानधन घेते.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही चर्चेत आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत. पतीच्या अटकेनंतर शिल्पा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शो मध्येही दिसत नाही. पण यामुळे शिल्पाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. शिल्पाच्या ऐवजी सध्या काही पाहुणे कलाकार शोमध्ये पहायला मिळतायेत.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या एका एपिसोडसाठी जवळपास १८ ते २२ लाख रुपये मानधन घेते. सध्या शोपासून लांब असल्यामुळे शिल्पा शेट्टीचे जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शिल्पा शोमध्ये लवकर परतणार असल्याची आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : ‘मी घाबरले आणि राजला धक्का देऊन…’, शर्लिन चोप्राने केला खुलासा

काही दिवसांपूर्वी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये शिल्पाच्या जागी अभिनेत्री रवीना टंडनला विचारण्यात आले होते. पण रवीनाने नकार दिल्याचे समोर आले. रवीनाला नकार देण्याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवीना म्हणाली, ‘हा शो शिल्पाचाच असेल आणि तिलाही शोमध्ये काम करायला आवडेल.’ रवीना सध्या परदेशात आहे. ती ऑगस्ट महिन्यात भारतात परत येणार आहे.

संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिल्पा शेट्टी ही शोचा एक महत्वाचा भाग होती आणि लवकरच ती शोमध्ये पुन्हा येईल अशी आशा करुया. तो पर्यंत गीता कपूर आणि अनुराग बासू हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार दिसणार आहेत.’

21
READ IN APP
X
X