22 March 2018

News Flash

इरफानच्या प्रकृतीविषयी सूजित म्हणतोय..

दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे इरफानने म्हटले होते.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 13, 2018 11:06 AM

इरफान खान, सूजित सरकार

एका दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्याच्या या ट्विटनंतर कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये त्याच्या प्रकृतीविषयी बऱ्याच चर्चा होऊ लागल्या. आता दिग्दर्शक सूजित सरकारने याविषयी माहिती दिली आहे.

सूजित आणि इरफानने ‘पीकू’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. सूजितने जेव्हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात हजेरी लावली, तेव्हा त्याला सर्वांत आधी प्रश्न इरफानच्या प्रकृतीविषयी विचारण्यात आला. त्यावर सूजितने स्पष्ट केले की, ‘ कृपा करून कोणत्याही अफवा पसरवू नका. त्याच्या तब्येतीविषयी सविस्तर माहिती काही दिवसांत देणार असल्याचे इरफानने स्वत: आधीच स्पष्ट केले होते. त्याची प्रकृती ठीक असून लवकरच तो त्यासंबंधीची माहिती सर्वांना देणार आहे.’ इरफानला ब्रेन कॅन्सर झाला असून तो मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनीही या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.

वाचा : लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात पोहोचणार ‘कटप्पा’

दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या आगामी चित्रपटात इरफान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारत आहेत. पण त्याच्या आजारामुळे या चित्रपटाचे शूटिंगदेखील अनिश्चित वेळेसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तर आजाराच्या निष्कर्षापर्यंत जेव्हा डॉक्टर पोहोचतील, तेव्हा पुढील १० दिवसांत मी स्वत:च याबाबत पूर्ण माहिती देईन, असे इरफानने त्याच्या ट्विटमध्ये स्पष्ट केले होते.

First Published on March 13, 2018 11:06 am

Web Title: shoojit sircar reacts on irrfan khans health
  1. No Comments.