News Flash

देशाला लुटण्याची हीच योग्य वेळ; बॉलिवूड दिग्दर्शकाचा उद्योजकांना उपरोधिक टोला

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी रात्रीच्या अंधारात प्राणघातक हल्ला केला.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी रात्रीच्या अंधारात प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचे देशाभरात पडसाद उमटले. याविषयी वेगवेगळी मते व्यक्त होत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक सुजीत सरकारनं उद्योजकांना उपरोधिक टोला लगावला आहे. “देशात निर्माण झालेल्या या गोंधळाचा फायदा उचलून देशातील सर्वसामान्य लोकांना लुटा,” असं ट्विट त्यानं केलं आहे.

‘मिसाईल मॅन’ अब्दुल कलामांवर बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

काय म्हणाला सुजित?

‘पिंक’, ‘पीकू’, ‘विक्की डोनर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या सुजीतने देशातील भ्रष्टाचारी व्यावसायिकांविरोधात एक ट्विट केले आहे. “नामवंत उद्योजकांनो देशाला लुटण्याची हीच खरी वेळ आहे. कारण देशातील अर्ध्याहून अधिक जनता अंधपणे कोणालाही पाठिंबा देण्यात व्यस्त आहे. लुटा वाट्टेल तसे या देशाला लुटा. पायाभूत सुविधा, नद्या, जंगले, विमानतळे, खाणी हवं ते लुटा. इथं तुम्हाला रोखणारं कोणीही नाही,” असं ट्विट करुन त्याने भ्रष्टाचारी व्यावसायिकांविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

मृत्यृनंतरही ‘हा’ रॉकस्टार कमावतो वर्षाला २८१ कोटी रुपये

यानंतर त्याने आणखी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने “मी जेव्हा देवाला भेटेन तेव्हा त्याला सांगणार आहे, यापुढे मानवाची निर्मिती करताना त्याला पोट देऊ नकोस. कारण त्याचे पोटच सर्व समस्यांची जननी आहे,” असंही त्यानं म्हटलं आहे. सुजीत सरकारनं केलेली ही दोन्ही ट्विट्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 5:23 pm

Web Title: shoojit sircar says best time to loot a country mppg 94
Next Stories
1 ‘स्वामिनी’मध्ये नीना कुळकर्णी साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
2 ‘बोनस’मध्ये पाहायला मिळणार गश्मीर महाजनी-पूजा सावंतची केमिस्ट्री
3 वृद्ध दिग्दर्शकाने मला कपडे काढायला सांगितले, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
Just Now!
X