करोनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र सरकारने मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी दिली. मात्र सुरुवातीला त्यासाठी काही नियम आखण्यात आले होत. या नियमांतर्गत ६५ वर्षांपुढील कलाकारांना सेटवर जाण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता महाराष्ट्र सरकारकडून ६५ वर्षावरील ज्येष्ठ कलाकारांना शुटिंगच्या सेटवर येण्याची परवानगी दिली गेली आहे. पण तरीही बरेचसे कलाकार घरातूनच आपापले सीन्स शूट करून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

यात ज्येष्ठ कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचंही नाव प्रकर्षाने घ्यायला हवं. ‘डॉक्टर डॉन’ या झी युवावरच्या मालिकेमध्ये रोहिणीताई डॉ मोनिका म्हणजेच अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या आईची भूमिका साकारत आहेत. सुरुवातीपासूनच मालिकेमध्ये देवा आणि मोनिका यांना जवळ आणण्याचे महत्वाचे काम रोहिणीताई करत आहेत.

लॉकडाउननंतर मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्यावर प्रेक्षकांना त्या व्हिडिओ कॉलवरुन पहायला मिळत होत्या. ज्यात त्यांची मुलगी डॉ मोनिका त्यांच्याशी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करते आणि त्या तिला त्यावरती मार्गदर्शन करत होत्या. पण अर्थातच व्हिडिओ कॉलवरुन. प्रेक्षक मात्र हि कूल आजी प्रत्यक्षात मालिकेत कधी भेटीस येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.