News Flash

मिर्झापूर वेब सीरिजचा सिक्वेल येणार, शुटिंगला सुरुवात

मिर्झापूर सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे

सध्या प्रेक्षक आणि खास करुन तरुणाईमध्ये वेब सीरिज पाहण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ‘सेक्रेड गेम्स’ नंतर भारतात खऱ्या अर्थाने वेब सीरिजचा ट्रेण्ड वाढला असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या सीरिजपैकी एक म्हणजे नुकतीच आलेली ‘मिर्झापूर’ वेब सीरिज. गुंडगिरी आणि त्याच्या विळख्यात सापडलेली दोन भावंडं यांच्याभोवती ही वेब सीरिज फिरताना दिसते. उत्कंठा वाढवणारा शेवट केल्याने अनेकांना मिर्झापूरच्या सिक्वेलची उत्सुकता लागलेली होती.

दरम्यान मिर्झापूर सिक्वेलच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मिर्झापूरमध्ये गुड्डूची भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अली फजलने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लवकरच शुटिंगला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी अली फजलने प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.

16 नोव्हेंबरला मिर्झापूरचा पहिला भाग रिलीज करण्यात आला होता. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. पहिल्या भागात एकूण 9 एपिसोड होते. अंशुमन यांच्या दिग्दर्शनाखाली लवकरच दुसऱ्या भागाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. अद्याप सिक्वेलची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 5:23 pm

Web Title: shooting to start for sequel of mirzapur web series
Next Stories
1 The Accidental Prime Minister : अनुपम खेर यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
2 व्हॉट्स ॲप युजर्ससाठी लवकरच येणार ‘व्हॉट्स ॲप लव’
3 The Accidental Prime Minister: दिग्दर्शकावर इंग्लंडमध्येही करघोटाळ्याचा आरोप
Just Now!
X