सध्या डिजिटलचा जमाना आहे. अधिकाधिक प्रेक्षकवर्ग वेब सीरिज पाहण्यातच आता दंग असतो. अगदी कमी कालावधीत उत्तम कथानक आणि सोबत मनोरंजनही होतं. लघुपटाचे देखील अगदी तसेच आहे. लघुपटही अगदी कमी वेळात प्रेक्षकांना खूप काही सांगून जातात. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना अगदी साध्या-सोप्या भाषेत मांडण्याची ताकद लघुपटात असते. हे लघुपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. ‘संक्रमण’ असाच एक लघुपट आहे.
काव्या ड्रीम मुव्हीज व किरण निनगुरकर यांची निर्मिती असलेला करोना विषयी प्रबोधन करणारा ‘संक्रमण’ हा लघुपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या लघुपटात प्रदीप कडू, प्रतिश सोनवणे, सुनील जाधव, अनिकेत कडू, अशोक कडू, सुनील जाधव, प्रवीण कडू व आशिष निनगुरकर यांच्या भूमिका आहेत.
गणेशोत्सवात वर्गणी मागण्यासाठी एक मुलगा एका वयस्कर व्यक्तीच्या घरी जातो आणि त्या मुलाला असलेल्या करोनाचा संसर्ग त्या ज्येष्ठ व्यक्तीला होतो. त्यापुढे काय घडतं हे लघुपटात पाहायला मिळतं. विजय कांबळे या नवोदित दिग्दर्शकाने या लघुपटाचे दिग्दर्शन केले असून आशिष निनगुरकर यांनी लेखन केले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी सिद्धेश दळवी यांनी सांभाळली असून लघुपटाचे संकलन विजय कांबळे यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 5:03 pm