बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. ते सतत एकत्र फिरताना, डिनर डेटवर जाताना दिसतात. त्यातच आता श्रद्धाचा रोहनच्या वाढदिवसाच्या पार्टितला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबईतल्या वरळीमध्ये असलेल्या बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये श्रद्धाने रोहनचा वाढदिवस साजरा केला. या पार्टित अभिनेता रणवीर सिंग देखील उपस्थित होता. त्याचा हो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रद्धाने हिरव्या आणि काळ्यारंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ती रेस्टॉरंटमधून बाहेर येऊन गाडीत बसू घरी निघाल्याचे दिसत आहे. त्यानंतर रोहन रेस्टॉरंटमधून बाहेर येतो आणि त्याच्या गाडीत बसतो. त्यानंतर नेहमी सारखा हटके अंदाजात रणवीर सिंग दिसतो.
View this post on Instagram
नुकताच श्रद्धाने तिचा ३४वा वाढदिवस संपुर्ण कुटूंब आणि रोहनसोबत मालदीवला साजरा केला. मालदीवला श्रद्धा तिचे संपुर्ण कुटूंब आणि रोहन पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्माच्या लग्नासाठी गेले होते. रोहन आणि श्रद्धाचे एक रोमॅंटीक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 7, 2021 5:48 pm