News Flash

बायोपिकमध्ये सायनाच्या प्रियकराची भूमिका साकारणार ‘हा’ खेळाडू

सायनाच्या बायोपिकचं चित्रीकरण सप्टेंबर महिन्यापासून सुरु करण्यात आलं आहे.

बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या बायोपिकच्या ट्रेंडमध्ये आता भारताची फुलराणी सायना नेहवालवरदेखील लवकरच बायोपिक येणार आहे. या बायोपिकमध्ये सायनाची भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूर वठविणार आहे. आतापर्यंत चित्रपटामधील केवळ सायनाच्या भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला होता. मात्र आता आणखी एका भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला आहे.

‘हिंदुस्थान टाईम्स’नुसार, अमोल गुप्ते दिग्दर्शत या चित्रपटामध्ये बॅडमिंटन खेळाडू आणि म्युझिशियन इशान नक्वी याची वर्णी लागली असून तो बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप याची भूमिका वठविणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी इशाननेच श्रद्धाला बॅडमिंटनचे धडे दिले आहेत. सायनाच्या बायोपिकचं चित्रीकरण सप्टेंबर महिन्यापासून सुरु करण्यात आलं आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून इशान श्रद्धाला बॅडमिंटनमधील बारकावे शिकवत आहे.

बायोपिकमध्ये सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.परंतु यात परुपल्ली याच्या भूमिकेसाठी नायकाचा शोध सुरु होता. परंतु अन्य कोणत्या अभिनेत्यापेक्षा दिग्दर्शकांनी इशान नक्वीलाच फायनल केलं आहे.

‘इशान हे उत्तम प्रशिक्षक असून त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आम्ही रोज सकाळी सहा वाजता प्रॅक्टीसला सुरुवात करत होतो’, असं श्रद्धाने काही दिवसापूर्वी सांगितलं होतं.

यापूर्वी मिल्खासिंग, महेंद्रसिंग धोनी, मेरी कॉम या खेळाडूंच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली असून या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यामुळे आता सायनाचा बायोपिक कसा असेल याकडे साऱ्याचं लक्ष वेधल आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2018 5:20 pm

Web Title: shraddha kapoor badminton coach eshan naqvi will also play her love interest in saina nehwal biopic
Next Stories
1 राखीनं मेंदूवरही प्लास्टिक सर्जरी केली, तनुश्रीचा सणसणीत टोला
2 बॉलिवूड फक्त सलमानच्या चित्रपटांसाठी ओळखलं जाऊ नये- नसिरुद्दीन शाह
3 ‘झी मराठी अॅवॉर्ड्स २०१८’मध्ये ‘तुला पाहते रे’ मालिकेने मारली बाजी
Just Now!
X