05 March 2021

News Flash

आता श्रद्धा कपूरच्या भावाचा नंबर; लवकरच अडकणार विवाह बंधनात

जाणून घ्या कधी करणार लग्न

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर, गायक-अभिनेता आदित्य नारायण हे लग्नबंधनात अडकले आहेत. यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा लग्न बंधनात अडकणार आहे. प्रियांक हा एक अभिनेता आहे. प्रियांक फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न करणार आहे. करीम मोरानी यांची लेक शजा मोरानीशी प्रियांक लग्न करणार आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांक आणि शजा या दोघांच्या कुटूंबीयांनी लग्नाची तयारी सुरु केली आहे. प्रियांक शजा सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत होता. गेली अनेक वर्षे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. आता ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत.

प्रियांक आणि शजा लवकरच कोर्टात लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये ते मोठ रिसेप्शन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyaank K Sharma (@priyaankksharma)

दरम्यान, प्रियांकने ‘सब कुशन मंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून भोजपुरी अभिनेता रवी किशन यांची मुलगी रीवाने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 5:02 pm

Web Title: shraddha kapoor brother priyank sharma is getting married dcp 98 avb 95
Next Stories
1 लग्नानंतर सईची नवी गूड न्यूज; ‘सनम हॉटलाइट’मध्ये साकारणार ‘ही’ भूमिका
2 ‘सनम हॉटलाइन’मध्ये झळकलेली तेजस्वी खताळ नेमकी आहे तरी कोण?
3  अजितच्या जाळ्यात अडकेल का मंजुळा? सरु आजी नेमकी कोणाची करणार मदत?
Just Now!
X