28 September 2020

News Flash

श्रद्धाने आपल्या १३ वर्षाच्या चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण

इतर रुग्णांना, रुग्णालय प्रशासनाला त्रास होऊ नये म्हणून ती बुरखा परिधान करुन गेली

श्रद्धा कपूर

अनेकदा चाहते आपल्या आवड्या अभिनेत्यांची एक झकल मिळवण्यासाठी धडपडताना दिसतात. मात्र अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने स्वत: आपल्या एका खास चाहतीची भेट घेतली आणि तिही रुग्णालयामध्ये जाऊन. यासंदर्भातील फोटो श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केला आहे.

साम्या नावाच्या या १३ वर्षीय चाहतीला श्रद्धा रुग्णालयात जाऊन भेटली आणि तिच्याबरोबर काढलेला फोटोही तिने शेअर केला आहे. मुंबईमधील एका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या साम्याला क्षयरोग झाला आहे. श्रद्धा ही साम्याची आवडती अभिनेत्री असून तिने श्रद्धाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. केटो या क्राऊण्ड फंडिंगच्या माध्यमातून समाजकार्यासाठी पैसे उभे करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून साम्या आणि श्रद्धाची भेट घडवून आणण्याचे ठरले. अखेर श्रद्धाला साम्याबद्दल समजले तेव्हा ती स्वत: आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढून साम्याला भेटण्यासाठी थेट रुग्णालायात गेली. यावेळी इतर रुग्णांना तसेच रुग्णालय प्रशासनाला सुरक्षेसंदर्भातील त्रास होऊ नये म्हणून तीने आपली ओळख लपवण्यासाठी बुरखा परिधान केला होता.

या भेटीच्या वेळी साम्या बरोबरच फोटो शेअर करताना श्रद्धा म्हणते, ‘आज मला साम्याला भेटता आले याचा मला खूप आनंद आहे. ती एखाद्या छोट्या परीप्रमाणेच आहे. तिला लवकर बरे वाटावे हीच इच्छा आहे. केटो (ज्या संस्थेच्या माध्यमातून भेट झाली) साम्याच्या उपचारांसाठी मी आणखीन कशाप्रकारे मदत करु शकते ते नक्की सांग. तुम्ही करत असलेल्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा.’

सध्या श्रद्धा ही जाहिराती आणि चार सिनेमांच्या शुटींगसाठी मुंबईहून सतत हैदराबादचे दौरे करत असते. या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तिने साम्याची भेट घेतली. सध्या ती या वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणाऱ्या शाहो सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असून या सिनेमात ती प्रभाससोबत झळकणार आहे. मागील वर्षी श्रद्धाची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘स्त्री’ सिनेमाने बॉक्सऑफिसवर अपेक्षेहून चांगली कामगिरी केल्याने सिनेमा सुपरहीट ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 11:21 am

Web Title: shraddha kapoor fulfills ailing fans wish to meet her
Next Stories
1 आला रे आला रोहित आला… ‘सिम्बा’च्या कमाईतील ५१ लाख दिले मुंबई पोलिसांना
2 एकता कपूर झाली आई
3 कपिल देवच्या बायोपिकमध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी
Just Now!
X