09 April 2020

News Flash

श्रद्धा कपूरनं दिल्या अस्सल मराठीतून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

श्रद्धानं शेअर केला आई आणि आजीसोबतचा 'तो' खास फोटो

गुढी पाडवा म्हणजे नवचैतन्याचा, मांगल्याचा दिवस. मराठी बांधवांनी त्यांच्या घरावर गुढी उभारून उत्साहात आणि आनंदात नव्या वर्षाचे स्वागत केले. अर्थात दरवर्षीप्रमाणे यंदा करोना विषाणूमुळे ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळणार नाही. मात्र तरीही सोशल मीडियावरुन मात्र शुभेच्छांचा वर्षाव करत लोक हा सण आनंदानं साजरा करताना दिसत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने देखील सर्व मराठी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये श्रद्धासोबत तिची आई आणि आजी सुद्धा दिसत आहेत.

“पिढ्यानपिढ्या जपलेला पेहराव…साडी, पिढ्यानपिढ्या उभारलेला सन्मान…गुढी, पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा… गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.” असे कॅप्शन या फोटोवर श्रद्धाने दिले आहे.
श्रद्धा कपूरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष: मराठी चाहत्यांनी श्रद्धाचा मराठमोळा लूक पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षावच केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 3:53 pm

Web Title: shraddha kapoor gudi padwa 2020 wish in marathi mppg 94
Next Stories
1 Video: केवळ २१ दिवस… आपण सर्व मिळून करोनाविरुद्धची ही लढाई जिंकू
2 coronavirus : क्वारंटाइनमध्ये मिलिंद सोमण घेतोय पत्नीकडून खास सेवा
3 Coronavirus : कनिका कपूरचा तिसरा रिपोर्टही आला पॉझिटिव्ह
Just Now!
X