27 February 2021

News Flash

२०२०मध्ये श्रद्धा कपूरचं शुभ मंगल सावधान?

२०१८पासून त्यांनी एकमेकांना डेट करण्यासही सुरूवात केली.

अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं टाळते. श्रद्धाचे अभिनेता फरहान अख्तर, आदित्य कपूर यांच्यासह नाव जोडण्यात आले होते. परंतु तिने हसत या सर्व चर्चांना उत्तरे दिले होती. आता श्रद्धा २०२०मध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहन श्रेष्ठा श्रद्धा कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार श्रद्धा आणि रोहन पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच श्रद्धाची आई शिवांगी कपूर या लग्नाची तयारी करत असल्याचेही म्हटले जात आहे.

अभिनेते शक्ती कपूर यांना श्रद्धाच्या लिंकअप बद्दल विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. ‘या सर्व अफवा आहेत. येत्या ४-५ वर्षात श्रद्धा लग्न करणार नाही. सध्या तिच्याकडे खूप प्रोजेक्टस आहेत आणि ती त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. पुढची दोन वर्षे तरी तिच्याकडे वेळ नाही’ असे शक्ती कपूर म्हणाले.

रोहन श्रेष्ठा हा एक बॉलिवूड फोटोग्राफर आहे. श्रद्धा आणि रोहन गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तसेच २०१८पासून त्यांनी एकमेकांना डेट करण्यासही सुरूवात केली. श्रद्धाचे कुटुंबीय श्रद्धा आणि रोहनच्या नात्याबाबत फार आनंदी आहेत.

सध्या श्रद्धा ‘छिछोरे’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. तसेच अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या व्यतिरिक्त दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात देखील ती झळकणार आहे. रेमो डिसूजाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातही श्रद्धा काम करणार आहे. तिच्या सोबत वरूण धवन देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 12:18 pm

Web Title: shraddha kapoor is all set to tie the knot with rumoured boyfriend rohan shrestha avb 95
Next Stories
1 ..तर भारत जिंकला असता- आमिर खान
2 Super 30 movie review: सामान्य गणितज्ञाची असामान्य कथा
3 कंगनाच्या वादावर एकताची माफी
Just Now!
X