News Flash

“ही झाडे आमची, नाही कुणाच्या बापाची”, आरेचे जंगल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरचा नारा

नागरिकांच्या या आंदोलनामध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील सहभागी झाली आहे.

मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी २ हजार २३८ झाडे अखेर कापण्यात येणार आहेत. या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. तर, नागरिकांच्या या आंदोलनामध्ये बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील सहभागी झाली आहे.

श्रद्धा कपूर आंदोलनात सहभागी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये श्रद्धा ‘ही झाडे आमची, नाही कुणाच्या बापाची’ असा नारा लगावताना दिसत आहे. तसेच, यावेळी श्रद्धा पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत असून तिच्या टी-शर्टवर ‘सेव आरे’ असा मजकूरही लिहिल्याचे दिसत आहे.

श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील या आंदोलनाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने ‘मेट्रो बांधकामसाठी २७०० हून अधिक वृक्ष तोडण्यात आले आहेत. आम्हाला हे मान्य नाही. आधीच आपल्याकडे पर्यावरणासंबंधीत खूप समस्या आहेत आणि त्यातच आमच्या फुफ्फुसांचा नाश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. झाडे तोडणे थांबवा’ असे कॅप्शन दिले आहे. श्रद्धाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. श्रद्धाचे पर्यावर प्रेम पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

यापूर्वी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी या आंदोलनात सहभागी झाली होती. तिने ‘मेट्रो-३ फक्त निमित्त, पुढे तिथे बाजारीकरण होऊन सिमेंटची जंगलं उभारणार.. ही खरी भीती आहे,’ म्हणत आंदोलनाचा व्हिडिओ शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 6:50 pm

Web Title: shraddha kapoor joins protest to save mumbai aarey forest avb 95
Next Stories
1 धर्मेंद्र यांनी फोटो शेअर केलेल्या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
2 जबरा फॅन! अक्षय कुमारसाठी त्याने केला ९०० किमी पायी प्रवास
3 मिस इंडिया वर्ल्डवाइड श्री सैनीचे मुंबईत जल्लोषात स्वागत
Just Now!
X