News Flash

दाऊदच्या कुटुंबाने घेतली श्रद्धा कपूरची भेट

त्यांनी मला हसीनाच्या काही वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेली दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्यावर चित्रपट काढण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़. नागपाडा येथील आलिशान ‘गॉर्डन हाऊस’मध्ये वास्तव्याला असलेल्या हसीनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ती दाऊदच्या सर्वात जवळ होती. तसेच, तिची जीवनकथाही रंजक असल्याने दिग्दर्शक अपूर्व लाखिया तिच्या जीवनावर ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ हा चित्रपट काढत आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही हसीना पारकरची भूमिका साकारत आहे. दरम्यान, दाऊदच्या परिवाराने अचानक जाऊन श्रद्धाची भेट घेतली. हसीनाची तिन्ही मुले चित्रपटातील कलाकारांना भेटण्यासाठी गेली होती.

याविषयी श्रद्धा म्हणाली की, हसीनाचा परिवार खूप सहकार्य करत आहे. त्यांनी मला हसीनाच्या काही वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यात हसीना घालत असलेल्या नाकातील नथीचाही समावेश आहे. ‘रॉक ऑन २’मध्ये मुख्य भूमिकेत झळकलेल्या श्रद्धाने जानेवारी महिन्यात ‘हसीना’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. चित्रपटातील भूमिका अधिक प्रभावी व्हावी म्हणून श्रद्धाने हसीनाच्या परिवारासोबत बराच वेळही घालवला होता.

श्रद्धा लवकरच ‘ओके जानू’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. यात ती अभिनेता आदित्य रॉय कपूरसह दिसेल. हा चित्रपट पुढील वर्षी १३ जानेवारीला प्रदर्शित होईल. याआधी ही जोडी ‘आशिकी २’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. काही दिवसांपूर्वीच ‘ओके जानू’ चित्रपटातील श्रद्धा आणि आदित्यचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत हे दोन्ही कलाकार जवळपास एकमेकांचे चुंबन घेताना दिसले. हा चित्रपट मणीरत्नमच्या ‘ओके कनमानी’चा रिमेक असून ही एक प्रेमकथा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 5:39 pm

Web Title: shraddha kapoor meets dawoods family on sets of haseena biopic
Next Stories
1 ‘डॅडी’साठी फरहान बनणार दाऊद इब्राहिम
2 अमितराज आणि आदर्श शिंदेचे अॅन्थम सॉन्ग
3 सॉफ्ट पॉर्न दाखवल्याप्रकरणी हॉट स्टार अडचणीत?
Just Now!
X