News Flash

Video: ‘साहो’चा टीझरपाहून प्रेक्षकांचा झिंगाट डान्स

श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्यांचा आगामी चित्रपट ‘साहो’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. १३ जून रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला. त्याचीच एक झलक श्रद्धा कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळते.

नुकताच श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका चित्रपट गृहामधील असून चाहते ‘साहो’च्या टीझरवर नाचताना दिसत आहेत. ‘प्रभासवर प्रेम करणारे चाहते. प्रभास आणि सुरजित सिंगसह काम करणे माझे स्वप्न होते. संपूर्ण टीमच्या दोन वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

‘साहो’ चित्रपटात प्रभास व श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर देखील झळकणार आहेत. ‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी हा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 2:12 pm

Web Title: shraddha kapoor shares a video of prabhas fans dancing on saaho teaser in theater avb 95
Next Stories
1 पी.टी.उषा यांच्या भूमिकेसाठी कतरिनासोबत आता जॅकलिनही शर्यतीत?
2 Photo : ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’मधील अर्जुनचा नवा लूक एकदा पाहाच
3 Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेला सोडायचं बिग बॉसचं घर ?
Just Now!
X