01 March 2021

News Flash

…म्हणून सायनाच्या बायोपिकचं चित्रीकरण मध्येच थांबलं

गेल्या २७ सप्टेंबरपासून हे चित्रीकरण थांबविण्यात आलं आहे.

श्रद्धा कपूर

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. यामध्येच फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटून सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका वठविणार असून काही दिवसापूर्वीच श्रद्धाचा लूक आऊट झाला. मात्र चित्रीकरण सुरु असतानाच श्रद्धाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे चित्रीकरण थांबविण्यात आलं आहे.

अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. परंतु श्रद्धाला डेंग्यु झाल्यामुळे हे चित्रीकरण मध्येच थांबवावं लागलं आहे. गेल्या काही दिवसापासून श्रद्धाची प्रकृती खालावली होती.त्यानंतर तिला डेंग्यु झाल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. यामुळेच गेल्या २७ सप्टेंबरपासून हे चित्रीकरण थांबविण्यात आलं आहे.

दरम्यान, तिच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून ती लवकरच सेटवर हजर होईल असं सांगण्यात येत आहे. श्रद्धाच्या अनुपस्थितीमध्ये या चित्रपटातील काही भागांचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसापासून श्रद्धाचं शेड्युल पूर्णपणे व्यस्त आहे. त्यामुळे सततच्या धावपळीमुळेच तिच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. पण ती लवकरच बरी होऊन चित्रीकरणाला सुरुवात करेल, असं चित्रपट निर्माते भूषण कुमार यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 1:07 pm

Web Title: shraddha kapoor suffer with dengue takes break from saina nehwal biopic
Next Stories
1 तनुश्री-नाना पाटेकर वादावर अर्जुन म्हणतो…
2 तनुश्री दत्ताविरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा
3 Tanushree Dutta Nana Patekar Row: सहाय्यक दिग्दर्शकाचा आँखो देखा हाल
Just Now!
X