News Flash

श्रध्दा कपूर फुटबॉल सामन्यात प्रमुख पाहुणी

'आशिकी २' प्रदर्शित होताच श्रध्दा कपूर नावारूपाला आली. माध्यामातील तिचे महत्व वाढले. अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तिला बोलावण्यात योऊ लागले. आता श्रध्दा एका फुटबॉल सामन्याच्या

| November 20, 2013 02:50 am

श्रध्दा कपूर फुटबॉल सामन्यात प्रमुख पाहुणी

‘आशिकी २’ प्रदर्शित होताच श्रध्दा कपूर नावारूपाला आली. माध्यामातील तिचे महत्व वाढले. अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तिला बोलावण्यात योऊ लागले. आता श्रध्दा एका फुटबॉल सामन्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहे. ‘आशिकी २’ ची ही अभिनेत्री फुटबॉल खेळाची खूप मोठी चाहती असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. आपल्या या फुटबल प्रेमापोटीच तिने ‘मुंबई फुटबॉल क्लब’च्या १९ वर्षाखालील सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे कबूल केले. या विषयी बोलतांना ती म्हणाली, पुन्हा एकदा मैदानावर जातांना मला मजा येणार आहे. श्रध्दा मुंबई संघातर्फे राज्य पातळीवर हॅन्डबॉल आणि परदेशात शिकत असतांना फुटबॉल खेळायची. करिना कपूर आणि इमरान खानच्या ‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटात श्रध्दा एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 2:50 am

Web Title: shraddha kapoor to be chief guest at football tournament
Next Stories
1 गुत्थीची भूमिका आणि वेशभूषेचे ‘कॉपीराईट्स’?
2 ‘धूम ३’च्या टायटल साँग लाँचमधून अभिषेक गायब
3 शॅरन स्टोनसोबत डिनर सन्मानाची गोष्ट- अभिषेक
Just Now!
X