News Flash

करणच्या ‘उंगली’मध्ये श्रद्धा कपूरचा आयटम साँग

आशिकी-२ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली श्रद्धा कपूर आता आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. करण जोहरच्या आगामी उंगली चित्रपटात ती आयटम साँग करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

| July 7, 2013 06:37 am

आशिकी-२ चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली श्रद्धा कपूर आता आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. करण जोहरच्या आगामी ‘उंगली’ चित्रपटात ती आयटम साँग करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला इमरानही सदर गाण्यात नृत्य करणार आहे. ‘उंगली’चे दिग्दर्शन रेन्सील डीसिल्वा करत असून संजय दत्त, नेहा धुपिया, इमरान हाश्मी, रणदीप हुड्डा, कंगना रनावत यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. करण जोहरच्या ‘गोरी तेरे प्यार मै’ चित्रपटात करीना आणि इमरान खानसोबत श्रद्धा काम करणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘द विलन’ चित्रपटात श्रद्धा सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 6:37 am

Web Title: shraddha kapoor to do an item song for karan johars ungli
Next Stories
1 ‘गुलाब गँग’ चित्रपटातील भूमिकेने माधुरी खुश!
2 ‘२ स्टेट्स’ चित्रपट १८ एप्रिलला होणार प्रदर्शित
3 ‘गुंडे’ चित्रपटात प्रियांकाचा कॅब्रे
Just Now!
X