News Flash

आता श्रद्धा कपूर साकारणार ‘इच्छाधारी नागिण’

'लपाछपी' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक करणार या चित्रपटाचं दिग्दर्शन

श्रद्धा कपूर

छोट्या पडद्यावर अनेक अभिनेत्रींनी नागिणीची भूमिका साकारली. मोठ्या पडद्यावरही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली. आता अभिनेत्री श्रद्धा कपूर अशीच भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर झालं असून विशाल फुरिया त्याचं दिग्दर्शन करणार आहेत. विशाल यांनी मराठीतील ‘लपाछपी’ या थरारपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

‘ऑनस्क्रीन नागिणीची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली आहे. नगिना आणि निगाहें या चित्रपटात श्रीदेवी यांना मी नागिणची भूमिका साकारताना पाहिलंय. अशा प्रकारची भूमिका साकारण्याची माझी फार इच्छा होती’, असं श्रद्धाने ट्विटरवर म्हटलंय.

आणखी वाचा : मराठी भाषेची चीड येते म्हणणारा जान कुमार आहे तरी कोण?

श्रद्धा कपूरचा हा आगामी प्रोजेक्ट तीन चित्रपटांची सीरिज असेल. निखिल द्विवेदी त्याचे निर्माते असतील. या चित्रपटाचं नाव आणि त्यात इतर कोणते कलाकार असतील याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. श्रद्धाने याआधी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती एका इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 2:01 pm

Web Title: shraddha kapoor to play naagin on the big screen ssv 92
Next Stories
1 आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे; शालिनी ठाकरेंचा इशारा
2 बिग बॉस व्यवस्थापन आणि जान कुमार सानूनं महाराष्ट्राची माफी मागावी; आदेश बांदेकरांची मागणी
3 समजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय?
Just Now!
X