News Flash

Video: मालदीवच्या किनाऱ्यावर श्रद्धाचा हटके लूक

श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच श्रद्धाने मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. श्रद्धा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नाही तर तिच्या भावाच्या लग्नासाठी गेली आहे. तिथला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

श्रद्धाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रद्धाने सीग्रीन रंगाचा लेहंगा परिधान केला असून ती समुद्र किनाऱ्यावर नाचताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करत श्रद्धाने #ShazaSharmaGayi हे हॅशटॅग वापरले आहे. सोबतच लग्नाच्या आधी सुरू असणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालदीवमधले श्रद्धाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

या आधी मालदीवला लग्नासाठी निघालेल्या, श्रद्धा आणि तिच्या भावाला सिद्धांतला मुंबई विमाणतळावर पाहिले होते. त्यावेळी दोघांनीही “तिकडे जिथे शजाचं लग्न प्रियांकशी होतं” असे लिहिलेलं टी-शर्ट परिधान केले होते.

प्रियांक हा प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा आहे. तर त्याची होणारी पत्नी शजा ही करीम मोरानी यांची लेक आहे. प्रियांक शजा सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. गेली अनेक वर्षे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जाते. आता ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत.

प्रियांकने ‘सब कुशन मंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून भोजपुरी अभिनेता रवी किशन यांची मुलगी रीवाने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 11:52 am

Web Title: shraddha kapoor twins with sea at cousins wedding in maldives aunt padmini kolhapure rohan shrestha attend dcp 98
Next Stories
1 ‘हिंग..पुस्तक..तलवार’, लवकरच येतेय नवी कोरी विनोदी वेब सीरिज
2 हरभजनचं मोठ्या पडद्यावर पदार्पण; चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
3 मोठ्या अपघातून बचावला सुयश टिळक, ‘माणुसकी जिवंत आहे’ म्हणत शेअर केली पोस्ट
Just Now!
X