23 July 2019

News Flash

सायनाच्या बायोपिकमधून श्रद्धाची गच्छंती; ही अभिनेत्री घेणार जागा

फुलराणी सायना नेहवालचा बायोपिक गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणात सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहिल्या.

फुलराणी सायना नेहवालचा बायोपिक गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहे. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणात सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येत राहिल्या. अखेर सायनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरने हा चित्रपट सोडला आहे. आता या बायोपिकमध्ये श्रद्धाऐवजी दुसरा चेहरा झळकणार आहे.

बॅडमिंटनच्या काही महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर श्रद्धाने शूटिंगला सुरुवात केली होती. पण शूटिंग सुरू होताच काही दिवसांनी तिला डेंग्यू झाला. त्यानंतर तिने तिच्या दुसऱ्या चित्रपटांसाठी काही वेळ दिला. एप्रिलमध्ये पुन्हा सायनाच्या बायोपिकचं शूटिंग सुरू होणार होतं. पण अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटातून श्रद्धाची गच्छंती झाली आहे. श्रद्धाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन चित्रपटांमध्ये सध्या श्रद्धा व्यग्र आहे. त्याचप्रमाणे प्रभाससोबतचा ‘साहो’ चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Video : आलियाचा बालपणीचा व्हिडिओ शेअर करत महेश भट्ट यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाने शक्य ते सर्व प्रयत्न करूनसुद्धा तारखांची जुळवाजुळव होत नव्हती. त्यामुळे श्रद्धाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यात आला. एकमेकांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आला असून अभिनेत्री परिणीती चोप्राला स्क्रिप्ट आवडली आहे. त्यामुळे आता या बायोपिकमध्ये श्रद्धाच्या जागी परिणीती सायनाची भूमिका साकारणार असून लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.

या वर्षाअखेपर्यंत शूटिंग संपवून २०२०च्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित करता यावं यासाठी हा निर्णय घेणं महत्त्वाचं होतं, असं निर्माते भूषण कुमार म्हणाले.

First Published on March 15, 2019 12:28 pm

Web Title: shraddha kapoor walks out of saina nehwal biopic parineeti chopra to fill in her shoes