14 December 2019

News Flash

श्रद्धा कपूर घेणार बॉलिवूडमधून ब्रेक?

'स्त्री' या चित्रपटामुळे श्रद्धा प्रकाशझोतात आली

‘आशिकी ३’, ‘एक व्हिलन’ आणि ‘हसीना पारकर’ या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री श्रद्धा कपूरला कलाविश्वातून काही काळासाठी ब्रेक घ्यायचा आहे. एकाच वर्षात सलग तीन चित्रपटांचं चित्रीकरण केल्यामुळे आता शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत असून ती बॉलिवूडमधून काही काळासाठी ब्रेक घ्यायचा विचार करत आहे.

“एकाच वर्षामध्ये सलग ‘साहो’, ‘छिछोरे’, ‘स्ट्रीट डान्सर’ या तीन चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. त्यामुळे मी आता प्रचंड थकले आहे. एकाच वर्षामध्ये सलग तीन चित्रपट करणं ही साधीसुधी गोष्ट नाही. त्यामुळेच आता मला थकवा आला आहे आणि मला काही काळ विश्रांतीची गरज आहे”, असं श्रद्धाने सांगितलं.

‘साहो’ , ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ हे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय ठरत आहेत. ‘साहो’ हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट तेलुगु, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा प्रथम सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर ‘छिछोरे’ ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, श्रद्धाने ‘आशिकी २’, ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘रॉक ऑन २’, ‘हसीना पारकर’, ‘ओके जानू’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटांतून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गायन, नृत्य, चित्रकला, लेखन यांची आवड असणाऱ्या श्रद्धाचा काही दिवसापूर्वी ‘स्त्री’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष गाजला असून या चित्रपटानंतर श्रद्धाची लोकप्रियता कमालीची वाढली.

 

First Published on August 13, 2019 12:34 pm

Web Title: shraddha kapoor want break from bollywood ssj 93
Just Now!
X