News Flash

“ना जाने कहा से आयी है….”, श्रद्धाचा डबल रोल!

चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

अभिनेत्री श्रद्धा कपूर वेगवेगळ्या कारणामुळे कायमच चर्चेत असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि आपल्या कामाबद्दल, आयुष्याबद्दलचे अपडेट्सही शेअर करत असते. आजही ती चर्चेत आहे तिच्या एका नव्या पोस्टमुळे! या पोस्टमधून तिने आपल्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली आहे.

श्रद्धाने आपला आगामी चित्रपट ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. एका खास व्हिडिओमधून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की यात श्रद्धा प्रथमच दुहेरी भूमिकेत म्हणजे डबल रोलमध्ये दिसणार आहे.

 

या चित्रपटाबद्दलची आपली उत्सुकता व्यक्त करताना श्रद्धा म्हणाली, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की निर्मात्यांनी ‘चालबाज इन लंडन’मधल्या भूमिकेसाठी माझा विचार केला. मी प्रथमच डबल रोलमध्ये दिसणार आहे आणि हे निश्चितच कोणत्याही कलाकारासाठी आव्हानात्मक असणार. माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकताना भूषण सर आणि अहमद सरांना हा विश्वास होता की मी ही जबाबदारी पार पाडेन. पंकज सरांसोबत काम करणं ही माझ्यासाठी शिकण्याची पार मोठी संधी होती.”

या चित्रपटाचं दिग्दर्शन पंकज पराशर यांनी केलं आहे. त्यांनीच श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेला मूळ ‘चालबाज’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या नव्या चित्रपटाची घोषणा करणारा हा व्हिडिओ जुन्या ‘चालबाज’च्या आठवणी जागवणारा आहे. कारण यात त्या चित्रपटातल्या ‘ना जाने कहा से आयी है’ या गाण्याचं संगीत आहे.

निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाची संपूर्ण कास्ट जाहीर केलेली नाही. पण ज्यावेळी कलाकार निश्चित होतील तेव्हा लगेचच चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 9:02 pm

Web Title: shraddha kapoors new movie she will perform double role in it vsk 98
Next Stories
1 आदित्य नारायण आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण
2 लस घेताना रडला राम कपूर; नंदिता दास, रघू यांचंही झालं लसीकरण
3 अर्जुन रामपालच्या मुलाचा आणि गर्लफ्रेंडचा फोटो व्हायरल
Just Now!
X