गेल्या काही काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे मनोरंजनाचं एक उत्तम माध्यम म्हणून पाहिलं जात आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हुलू, हॉटस्टार, एम एक्स प्लेअर यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मवरुन एकापेक्षा एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. परिणामी जगभरातील कलाकारांनी आता आपलं लक्ष चित्रपट आणि मालिकांसोबतच वेब सीरिजच्या दिशेने देखील वळवलं आहे. मात्र या वेब सीरिजवर अनेकदा अश्लिलता आणि हिंसेचा प्रचार केल्याची टीका देखील केली जाते. हे टीकाकार ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशीपची मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला अभिनेत्री श्रेया बुगडे हिने विरोध केला आहे. असं झाल्यास सर्जनशिलता संपून जाईल, अशी भीती तिने व्यक्त केली.

अवश्य पाहा – “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
woman mistakenly sat on another person bike instead of boyfriend funny video
तरुणी प्रियकराऐवजी अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर जाऊन बसली अन् मग..विचित्र घटनेचा VIDEO
documentary making and Changers of Attitudes
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..
kutuhal writer noam chomsky
कुतूहल : नोम चॉमस्की

चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे एक नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘बायकोला हवं तरी काय’ असं या सीरिजचं नाव आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत श्रेयानं ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील सेन्सॉरशीपवर भाष्य केलं. ती म्हणाली, “सेन्सॉरशीप लादल्यामुळं निर्मात्यांच्या सर्जनशीलतेवर मर्यादा येतात. निर्मात्यांना मुक्तपणे कलाकृतीची निर्मिती करता येत नाही. अनेकदा एखादा सीन त्या पटकथेचा महत्वाचा भाग असतो. परंतु काही सेन्सॉरच्या मर्यादेमुळे त्याला एडिट करावं लागतं. असे प्रकार चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेकदा घडतात. त्यामुळे अनेक प्रयोगशाली निर्मात्यांनी आता वेब प्लॅटफॉर्म्सचा रस्ता निवडला आहे. जर इथेही सेन्सॉरचा धाक दाखवला गेला तर आता जितक्या चांगल्या वेब सीरिज आपण पाहतोय तशा कदाचित पाहायला देखील मिळणार नाहीत. शिवाय आपले प्रेक्षक देखील सुजाण आहेत. काय चांगल अन् काय वाईट त्यांना देखील कळत. कुठल्या वेब सीरिजमध्ये कशा प्रकारचा कॉन्टेंट पाहायला मिळेल याची त्यांना पुर्ण माहिती असते. त्यामुळे सेन्सॉर लादण्यापेक्षा काय पाहायचं अन् काय नाही हे आपण प्रेक्षकांवरच सोपवूया.”

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

‘बायकोला हवं तरी काय’ ही एक विनोदी सीरिज आहे. यामध्ये श्रेयासोबत अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि निखील रत्नपारखी यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आपला नवरा सर्वगुण संपन्न असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. तसंच काहीसं बायकोला हवं तरी कायमधील या गृहिणीला देखील वाटत आहे. त्यामुळेच ती श्रीकृष्णाकडे आपल्या पतीला अपग्रेड करण्यास सागते. त्याला रुबाबदार, अध्यात्मिक गुरुसारखा शांत, प्रचंड श्रीमंत करण्यास सांगते. परंतु, हे अपग्रेशन सुरु असताना घडणाऱ्या काही गंमतीजंमती या सीरिजमध्ये पाहायला मिळत आहेत.