20 January 2020

News Flash

Photo : …म्हणून होतेय श्रेया बुगडेच्या ‘या’ टॅटूची चर्चा

श्रेयाने तीन टॅटू काढले आहेत

आजच्या तरुणाईमध्ये टॅटूचं प्रचंड क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कालाकारांना टॅटूची आवड असून त्यांनी वेगवेगळ्या डिझाइनचे टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर ,श्रेया बुगडे,मानसी नाईक, तेजस्विनी पंडित या अभिनेत्रींना टॅटूची विशेष आवड असल्याचं पाहायला मिळतं. श्रेयाने तर चक्क तीन टॅटू गोंदवून घेतले आहेत. मात्र या तीनही टॅटूंपैकी तिने काढलेल्या महादुर्गा या टॅटूची खास चर्चा रंगताना पाहायला मिळते.

श्रेयाने ‘आराध्य’, ‘इक्विलिब्रियम’ आणि ‘महादुर्गा’ असे तीन टॅटू काढले आहेत. या तिन्ही टॅटूंपैकी तिने काढलेल्या महादुर्गा या टॅटूची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगत आहेत. श्रेयाने हा टॅटू नक्की कोणत्या हेतूने काढला असावा असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. मात्र एका कार्यक्रमामध्ये श्रेयाने या टॅटूमागचा अर्थ सांगितला.

श्रेया ज्यावेळी टॅटू काढायला गेली होती, त्यावेळी तिला महादुर्गेचा टॅटू आवडला होता आणि महादुर्गेचं हे टॅटू म्हणजे एकप्रकारे शक्तीचंच प्रतिक आहे त्यामुळे तिने हा टॅटू काढण्याचा निर्णय घेतला. हा टॅटू पाहिल्यानंतर तिला एका गोष्टीची आठवण झाली की, शाळेमध्ये असताना तिच्या एका वहीवर सेम असंच महादुर्गेचं चित्र होतं. त्यामुळेच तिने हा टॅटू काढण्याचा निर्णय घेतला.

 

View this post on Instagram

 

I am a WOMEN …what’s your SUPERPOWER?? #whyjust8thmarch #womensdaytoday #womensdayeveryday

A post shared by Shreya Bugde Sheth (@shreyabugde) on


दरम्यान, श्रेयाने उजव्या हातावर ‘आराध्य’ या नावाचं टॅटू काढलं आहे. हे तिच्या भाच्याचं नाव असून गणपतीवरदेखील तिची श्रद्धा आहे त्यामुळे तिने आराध्य हा टॅटू काढला आहे. दुसरा टॅटू ‘इक्विलिब्रियम’चा आहे. इक्विलिब्रियम हा समतोल दर्शवितो. तर तिसरा टॅटू महादुर्गे’चा आहे.

First Published on October 18, 2019 1:44 pm

Web Title: shreya bugde fell in love with mahadurga tattoo ssj 93
Next Stories
1 नेहा कक्करच्या ‘इमोशन’वर नेटकऱ्यांनी पाडला ‘मीम्स’चा पाऊस
2 अनुप जलोटा प्रेयसीसोबत झळकणार चित्रपटात
3 निळू फुलेंच्या मुलीने ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका
Just Now!
X