24 November 2020

News Flash

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता दिसणार अनोख्या अंदाजात

तिला विविध व्यक्तिरेखेत पाहायला प्रेक्षकांना आवडतं

प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आता सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हो हे खरं आहे! यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे हिने सांभाळली. तिचे विनोद, तिचा भन्नाट टायमिंग यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी तर आहेच आणि म्हणूनच तिला विविध व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना पाहायला आवडतंच. त्यामुळे यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये श्रेयाला सूत्रसंचालिकेची भूमिका निभावताना पाहणं म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.

प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांना हसवण्याचा विडा उचलेल्या प्रत्येक कलाकाराचा सन्मान करणाऱ्या या कॉमेडी अवॉर्ड्सच्या सूत्रसंचालिकाची भूमिका श्रेया सारखी कॉमेडी क्वीन निभावणार असल्यामुळे यंदाच्या सोहळ्याला ४ चांद लागतील असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. यामध्ये तिला महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदवीर भाऊ कदम आणि योगेश शिरसाट साथ देणार आहेत.

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना श्रेया म्हणाली, “यंदाचं झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्सचं स्वरूपच खूपच वेगळं होतं. हे अवॉर्ड्स यावर्षी व्हर्च्युअली करण्यात आले आणि त्यात मला सूत्रसंचालनाची जाबदारदारी दिली त्यामुळे थोडं चॅलेंजिंग वाटलं. कारण प्रत्येक वर्षी ऑडियन्समध्ये कलाकार बसलेले असतात ज्यांच्यावर पंच लिहिले जातात किंवा लाईव्ह ऑडियन्स असतानाचा गिव्ह अँड टेक खूप वेगळा असतो. यंदा सर्व नॉमिनीज आमच्यासोबत व्हर्च्युअली जोडले गेले होते, त्यामुळे हा वेगळाच आणि आव्हानात्मक अनुभव होता. भाऊ कदम आणि योगेश शिरसाट यांनी मला खूप चांगली साथ दिली. आम्हाला हा वेगळा प्रयोग करताना खूप मजा आली आणि प्रेक्षकांना ते बघताना देखील नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 3:30 pm

Web Title: shreya bugde going to host zee talkies comedy awards avb 95
Next Stories
1 सलमानही चंद्रमुखी चौटालाचा फॅन; म्हणाला…
2 “४ हजार कोटी द्या चित्रपट ऑनलाईन रिलीज करतो”; निर्मात्याची खुली ऑफर
3 …तर जेनेलियासोबत झालं असतं ब्रेकअप; रितेशने सांगितला मजेदार किस्सा
Just Now!
X