News Flash

“डोहाळे पुरवा…सखीचे डोहाळे पुरवा!”, श्रेया घोषालला डोहाळेजेवणाचं ‘हे’ खास सरप्राईझ!

इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही घोषणा केली होती. श्रेयाने पुन्हा काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आहेत तिच्या डोहाळेजेवणाचे! श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला हे छानसं सरप्राईझ दिलं आहे.

श्रेयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “लांब असूनही जेव्हा तुमच्या मैत्रिणींना तुमचे लाड पुरवायचे असतात. माझ्या ‘बावरी’जकडून ऑनलाईन सरप्राईझ डोहाळेजेवण…प्रत्येकीने स्वतःच्या हाताने काहीतरी करून पाठवलं. खूप मज्जा आली, खेळही खेळले. मी किती लकी आहे!”

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला सरप्राईझ देत ऑनलाईन डोहाळेजेवण आयोजित केलं होतं. तिच्या मैत्रिणींनी खास तिच्यासाठी बनवलेले पदार्थही तिला पाठवले होते. मार्च महिन्यात श्रेयाने आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती. आपल्या पतीसोबतचा फोटो तिने यावेळी शेअर केला होता. श्रेयाने आपल्या या खास काळाबद्दलच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. ती म्हणाली होती, “ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात छान भावना आहे. मी आयुष्यातल्या सर्वात सुंदर काळात आहेत. खरंच हा देवाचा चमत्कार आहे.”

श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिला मार्चमध्ये दोन मिर्ची म्युझिक पुरस्कार मिळाले. दशकातली सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून तसंच श्रोत्यांच्या पसंतीची गायिका म्हणूनही तिला गौरवण्यात आलं. सध्या तिचं ‘ओ सनम’ हे गाणं युट्युबला ट्रेंडिंग आहे. गायक टोनी कक्करने श्रेयासोबत हे गाणं गायलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 1:45 pm

Web Title: shreya ghoshal baby shower photos vsk 98
Next Stories
1 विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदचा पुढाकार; व्हिडिओ शेअर करत म्हणाला,”…”
2 Chupke Chupke: ‘जलसा’ हे घर कसं झालं? अमिताभ यांनी सांगितली ४६ वर्षांपूर्वीची गोष्ट
3 चित्रपटसृष्टीची सावध पावलं; चार दिवसांत ९ हजार कर्मचाऱ्यांच्या RT PCR चाचण्या
Just Now!
X