मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. झी युवावरील ‘गुलमोहर ‘या मालिकेच्या निमित्ताने श्रेयस अभिनेत्री गिरीजा ओक – गोडबोले हिच्यासोबत प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसेल. श्रेयश आणि गिरीजा हे दोघेही उत्तम कलाकार असून दोघांनीही यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, या दोघांनी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

वाचा : सई ताम्हणकरचा बोल्ड लूक

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

गुलमोहर ही छोट्या छोट्या सुंदर हृदयस्पर्शी कथांवर आधारित मालिका आहे. ही मालिका २२ जानेवारीपासून सोमवार आणि मंगळवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवावर पाहायला मिळेल. ‘ स्माईल प्लिज ‘ ही या मालिकेची पहिली कथा असेल. श्रेयस सतत हसायचं आणि हसवायचं ‘स्माईल प्लीज’ म्हणत छोट्या पडद्यावर आगमन करतोय.

वाचा : सैफ इनायापासून तैमुरला ठेवतोय दूर!

श्रेयसला त्याच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘झी नेटवर्क म्हणजे दर्जेदार मनोरंजनाचा खजिना, नवे पर्व…युवा सर्व असे बिरूद घेऊन आलेल्या झी युवा या नव्या चॅनेलने वर्षभरातच युवास्पंदने अचूक टिपली. मैत्रीतील जीवाभावाचे सख्य, कॉलेजमधील मोरपंखी दिवस, प्रेमात पडल्यानंतरचा नवथरपणा, हॉस्टेल लाइफ अशा आजच्या तरूणाईच्या भावविश्वाचे आकाशच जणू झी युवा चॅनेलने आपल्या कवेत घेतले. त्यामुळेच झी युवा वाहिनीने जेव्हा मला ‘ गुलमोहर’ मालिकेतील पहिली कथा ‘स्माईल प्लिज’साठी विचारले तेव्हा माझे हो म्हणणे अपेक्षितच होते . या गोष्टीत गिरीजा ओक गोडबोले , उदय सबनीस आणि उदय टिकेकर माझ्याबरोबर काम करत असून मंदार देवस्थळीसारखे उत्तम दिग्दर्शक ही मालिका दिग्दर्शित करत आहेत.’