30 September 2020

News Flash

‘सनई चौघडे’नंतर श्रेयसचा ‘पोश्टर बॉईज’

मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत गेलेला मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आता पुन्हा मराठीकडे वळला आहे.

| February 3, 2014 02:41 am

मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत गेलेला मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आता पुन्हा मराठीकडे वळला आहे. ‘सनई चौघडे’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर तो अजून एका चित्रपटाच्या निर्मितीकरता सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे शूटींग सूरू असून, ‘पोश्टर बॉईज’असे या चित्रपटाचे हटके शिर्षक आहे.
‘पोश्टर बॉईज’मध्ये दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, ऋषिकेश जोशी, पूजा सावंत, नेहा जोशी, ज्ञानदा चेंबुरकर अशी मोठी स्टारकास्ट असणार आहे. या चित्रपटाचे संगीत प्रसिद्ध संगीतकार लेस्ली लुइस देणार आहे. लेस्लीसाठी हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात श्रेयस काम करत नसला तरी तो यात एक गाणे गाण्याची शक्यता आहे. मध्यंतरी हनी सिंग आणि लेस्ली हे एकत्र येऊन मराठीतलं पहिलं रॅप साँग बनवणार असल्याची चर्चा होती. कदाचित ते याचं चित्रपटासाठी असावे. जर असं असेल तर हा चित्रपट मोठ्या थाटामाटात तयार होतोय असे म्हणायला काहीचं हरकत नाही. तसेच, या चित्रपटात तो काम करत नसला तरी निखिल महाजन दिग्दर्शित चित्रपटात तो सुपरहिरो साकारणार आहे. त्यामुळे श्रेयस तळपदे त्याचा अमूल्य वेळ आपल्या मायबोली मराठीसाठी देणार आहे असे दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2014 2:41 am

Web Title: shreyas talpade producing marathi movie poshter boys
Next Stories
1 सलमानच्या बॅड बूकमध्ये कपिल शर्मा?
2 ‘मिफ्फ २०१४’
3 वाह उस्ताद!
Just Now!
X