दूरदर्शन वाहिनीवर ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत होती. मालिका प्रदर्शित होताच वाहिनीने अनेक नवे विक्रम केले. पण उत्तर रामायण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लव- कूश या मालिकेचा काल शेवटचा भाग प्रदर्शित झाला. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे मालिकेची प्रशंसा देखील केली. पण आता कोणती मालिका पाहायची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण दूरदर्शनने प्रेक्षकांच्या आवडीचा विचार करुन रामानंद सागर यांची आणखी एक मालिका प्रेक्षकांसाठी पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता दूरदर्शन वाहिनीवर ‘श्री कृष्ण’ ही मालिका प्रदर्शित होणार आहे. ही मालिका आज रात्री ९ वाजता रामायण मालिकेच्या वेळेतच दूरदर्शन वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. याची माहिती दूरदर्शन वाहिनीने ट्विटरद्वारे दिली आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

दूरदर्शनने ट्विटरद्वारे प्रेक्षकांना श्री कृष्ण मालिका कधी लागणार याची माहिती दिली आहे. ‘वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥ आज रात्री ९ वाजता श्री कृष्ण ही मालिका पाहा दूरदर्शन वाहिनीवर’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी रामानंद सांगर यांची रामायण त्यानंतर उत्तर रामायण म्हणून ओळखली जाणारी लव कूश ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष आवडत असल्याचे समोर आले होते. आता या दोन्ही मालिकांपाठोपाठ श्रीकृष्ण ही मालिका पुन्हा प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येणार आहे.