अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर टीका होत आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेत्री श्रुती हसन हिने देखील उडी घेतली आहे. तुम्हाला सिनेउद्योगातील घराणेशाही दिसते पण इतर व्यवसायांमधील नाही, असं प्रत्युत्तर तिने टीकाकारांना दिलं आहे.

अवश्य पाहा – “सलमानच्या घरात तीन महिने राहिल्यानंतर…”; अभिनेत्याने उडवली जॅकलीनची खिल्ली

श्रुती हसन अभिनेते कमल हसन यांनी मुलगी आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने सिनेउद्योगातील घराणेशाहीवर भाष्य केलं. ती म्हणाली, “घराणेशाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. पण टीकाकारांना केवळ सिनेउद्योगातीलच घराणेशाही दिसते. ही मंडळी इतर व्यवसायांवर प्रश्न उपस्थित करत नाही. इतर कलाकारांप्रमाणे स्टार किड्सला देखील चित्रपट उद्योगात टिकून राहण्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्हाला ओळखीवर सुरुवातीला एक दोन चित्रपट मिळतात पण ते जर फ्लॉप झाले तर कोणीही काम देत नाही. त्यामुळे इंडट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी स्टार किड्सला देखील तितकीच मेहनत करावीच लागते.”

अवश्य पाहा – करोनाची भीती; ‘या’ अभिनेत्रीच्या घरातच तयार केला मालिकेचा सेट

श्रुतीने २००० साली ‘हे राम’ या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर तब्बल ९ वर्षानंतर तिला ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र या चित्रपटात तिने केलेल्या अभिनयाची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली होती. त्यानंतर तिने अभिनयाचं योग्य प्रशिक्षण घेतलं अन् २०११ मध्ये ‘अनगंगा धीरडू’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. सध्या श्रुती हसन एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.