09 April 2020

News Flash

Coronavirus : श्रुती हासनचे आईवडील, बहीण राहतायत वेगवेगळ्या घरात

चौघंही परदेशाहून आल्याने चार वेगवेगळ्या घरात केलं विलगीकरण

अक्षरा हासन, कमल हासन, श्रुती हासन

वडील कमल हासन, आई सारिका, बहीण सारिका व मी वेगवेगळ्या घरात स्वविलगीकरणात राहतोय, असं अभिनेत्री श्रुती हासन सांगितलं आहे. चौघंही वेगवेगळ्या ठिकाणाहून फिरून आल्याने प्रत्येकाने स्वत:चं विलगीकरण करून घेतलंय. सारिका व श्रुती हे मुंबईत दोन वेगळ्या घरात राहत असून कमल हासन व अक्षरा हे चेन्नईत वेगळ्या घरात राहत आहेत.

१० दिवसांपूर्वी श्रुती लंडनहून मुंबईला परतली आणि तेव्हापासूनच तिने स्वविलगीकरण केलं. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मला घरात एकटं राहायची सवय आहे पण बाहेर फिरता येऊ शकत नाही याचं फार वाईट वाटतं. माझे आईवडील व बहीण वेगवेगळ्या घरात राहत आहेत. कारण आम्ही चौघंही विविध ठिकाणाहून भारतात परतलो आहोत. त्यामुळे चौघांनी एकाच घरात राहणं योग्य नव्हतं. लोकांनीसुद्धा गांभीर्य लक्षात घ्यावं आणि घराबाहेर पडू नये.”

आणखी वाचा : दुसऱ्यांदा कनिका कपूरचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

दरम्यान, महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे. यात पुण्यात तीन नवीन रुग्ण सापडले असून साताऱ्यात एक रुग्ण आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 11:02 am

Web Title: shruti haasan dad kamal haasan mom sarika sister akshara self isolate in separate houses ssv 92
Next Stories
1 ‘गो करोनिया… गो गो करोनिया’, कुशल बद्रिकेचे भन्नाट गाणे पाहिलेत का?
2 Coronavirus : घरात राहून ‘या’ कामात रमतीये कतरिना; पाहा तिचा हटके व्हिडीओ
3 दुसऱ्यांदा कनिका कपूरचा करोना व्हायरसच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Just Now!
X