News Flash

अभिनेत्री श्रुती हसनची पोलिसांत तक्रार

अभिनेत्री श्रुती हसन सध्या येवाडु या तामिळ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी चित्रीकरणादरम्यानच्या काही भागांची माहिती आणि छायाचित्रे ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित करण्यात आल्याने श्रुती हसनने

| May 21, 2014 04:02 am

अभिनेत्री श्रुती हसन सध्या येवाडु या तामिळ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यावेळी चित्रीकरणादरम्यानच्या काही भागांची माहिती आणि छायाचित्रे ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित करण्यात आल्याने श्रुती हसनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत हे प्रकरण आता केंद्रीय अन्वेषण शाखे(सीआयडी) च्या कायदे विभागाकडे सोपवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी चित्रीत झालेल्या येवाडु चित्रपटातील श्रुती हसनवर चित्रीत झालेले ‘डिंपल पिंपल’ गाणे सध्या इंटरनेटवर पहायला मिळत आहे. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानची काही आक्षेहार्प दृश्ये विनापरवानगी कुणीतरी जाणूनबुजून ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित केल्याची तक्रार श्रुती हसनने केली आहे. काही संकेतस्थळांवर ‘येवाडु’ हा चित्रपट अनधिकृतरित्या प्रसारितसुद्धा करण्यात आला आहे.       

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 4:02 am

Web Title: shruti haasan lodges police complaint for leaked yevadu pictures
Next Stories
1 ‘गे’ प्रेमकथेवर आधारित चित्रपटांसाठी बॉलिवूड सज्ज- सोनम कपूर
2 कान महोत्सवातील रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय मत्स्यकन्येच्या रूपात
3 ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’ (IMFF) चा मुंबईत चित्रपट महोत्सव
Just Now!
X