17 January 2021

News Flash

श्रृतीने वडिल कमल हासनबाबत केला खुलासा, म्हणाली…

तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांची संवाद साधताना हे म्हटले आहे.

अक्षरा हासन, कमल हासन, श्रुती हासन

सध्या लॉकडाउनमुळे सर्वचजण घरात अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेकजण सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसत आहे. या यादीमध्ये मोठमोठ्या कलाकारांचा देखील समावेश आहे. ते लॉकडाउनमुळे आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतच आहेत, पण त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी देखील संवाद साधत आहेत. नुकताच अभिनेते कमल हासन यांची मुलगी श्रृती हासन हिने चाहत्यांशी संवाद साधला आहे. दरम्यान तिने वडिलांबाबत एक खुलासा केला आहे.

श्रृती हासनने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला तेव्हा चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यावेळी तिला एका चाहत्याने ‘तुला आतापर्यंत मिळालेली सर्वात वाईट शिक्षा कोणती?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर श्रृतीने दिलेल्या उत्तराने कमल हासन यांचे त्यांच्या मुलींवरचे जीवापाड प्रेम असल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

SELF ISOLATING SINCE 1986 one of my last shoots before lock down – I do miss working with people and the energy of a movie set and the lovely vibe of a jam room but isolating is something we HAVE TO DO and when the lock down eases it doesn’t mean you go out and throw a party and squish each other. PLEASE STAY HOME as much as you can. We are up against something unseen and it’s something we haven’t understood yet. So we must not behave as Though we are invincible or can somehow negotiate with a virus !! This time can be used to talk with yourself and ask yourself the questions you’ve been avoiding and maybe find a way to find some new answers ! ALSO a time to have gratitude for what you do have , your food your friends your family and your comforts .Sending everyone lots of love and tonnes of good joo joo

A post shared by @ shrutzhaasan on

‘माझ्या वडिलांनी मला कधीच शिक्षा दिली नाही किंवा माझ्यावर ओरडलेही नाहीत. त्यांना असे वागणे आवडत नाही. पण एकदा मी चुकी केली होती तेव्हा मी तुझ्यावर खूप निराशा आहे इतकच ते मला म्हणाले होते’ असा खुलासा श्रृतीने केला.

त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्याने तुझे वडिल कमल हासन कुठे आहेत असा प्रश्न विचारला होता. ‘ते चेन्नई असून त्यांनी स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:25 pm

Web Title: shruti haasan on dad kamal haasan he never punished yelled at me avb 95
Next Stories
1 वयाच्या ५० व्या वर्षीही ‘ही’ अभिनेत्री भल्याभल्या अभिनेत्रींना देते टक्कर
2 “…म्हणून नैराश्यात जाणं मला परवडणार नाही”; चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर
3 “तीन वर्ष मी लॉकडाउनमध्येच होतो”; रणदीप हुड्डाने सांगितला धक्कादायक अनुभव
Just Now!
X