20 January 2020

News Flash

दारुच्या व्यसनाबाबत श्रुती हासनचा खुलासा

या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत.

श्रुती हासन

अभिनेते कमल हासन यांची मुलगी व अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. प्रियकराशी ब्रेकअप झाल्यानंतर ती पहिल्यांदाच त्यावर मोकळेपणाने व्यक्त झाली. त्याचसोबत दारुच्या व्यसनाबाबतही तिने खुलासा केला.

‘फीट अप विथ स्टार्स’ या चॅट शोमध्ये तिने सांगितलं, ”मी व्हिस्कीच्या इतक्या आहारी गेले होते की त्याचा परिणाम माझ्या करिअरवरही होऊ लागला होता. हे व्यसन नंतर इतकं वाढलं की मला अभिनयातून ब्रेक घ्यावा लागला होता.” गेल्या वर्षी पूर्णपणे व्यसनमुक्त झाल्याचंही श्रुतीनेही कबूल केलं. तिची तब्येत काही दिवसांपूर्वी बिघडली होती आणि हे दारुच्या अतिसेवनामुळेच झाल्याचं तिने सांगितलं. काही महिन्यांपूर्वीच श्रुतीचा ब्रेकअप झाला होता. ”मला कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. माझ्यासाठी तो संपूर्ण एक चांगला अनुभव होता. त्यातून मी खूप काही शिकले”, असं ती ब्रेकअपबद्दल म्हणाली.

Photos: ऐश्वर्यासोबत आराध्या नाही तर ‘कुछ कुछ..’मधील अंजलीच जणू!

श्रुती बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही सक्रिय आहे. नुकतीच ती धनुषच्या ‘थ्री’ या चित्रपटात झळकली होती.

First Published on October 12, 2019 2:24 pm

Web Title: shruti haasan opens up on alcohol addiction ssv 92
Next Stories
1 Photo: ऐश्वर्यासोबत आराध्या नाही तर ‘कुछ कुछ..’मधील अंजलीच जणू!
2 अनन्या पांडेच्या ड्रेसवर संजय कपूरची आक्षेपार्ह कमेंट; म्हणाला…
3 प्रेक्षकांच्या लाडक्या आक्कासाहेब लवकरच नव्या मालिकेत
Just Now!
X