21 September 2020

News Flash

‘शुभ लग्न सावधान’साठी छापण्यात आली लग्नपत्रिका

हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या वर्षभरामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक उत्तम धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती झाली असून त्याला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं देखील पाहायला मिळालं. खरंतर या चित्रपटाच्या लोकप्रियतेमागे चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीकरणाच्या पद्धतीचा हात असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असल्याचं पाहायला मिळतं. त्याप्रमाणेच एका नव्या चित्रपटाचंदेखील अशाच हटके पद्धतीने प्रमोशन करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

विनय जोशीनिर्मित ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर चक्क लग्नाची पत्रिका अपलोड केली आहे. आतापर्यंत प्रथमच अशी चित्रपटाची लग्नपत्रिका छापण्यात आल्यामुळे सर्वत्र या पत्रिकेची चर्चा होताना दिसत आहे.

‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटात नक्की कोणाचे शुभ लग्न पाहवयास मिळणार आहे? ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी चित्रपटाच्या टीमने हा मार्ग अवलंबल्याचं पाहायला मिळत आहे. अपलोड करण्यात आलेल्या पत्रिकेमध्ये मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये हे शुभेच्छुक म्हणून दिसत आहेत. तर ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशीर्वाद देत आहेत.

दरम्यान, हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे नवोदित कलाकार प्रतिक देशमुख आणि रेवती लिमये यांनी प्रेक्षकांना आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 9:26 am

Web Title: shubh lagn savadhan invitation card
Next Stories
1 रोहित-जुईलीमुळे मिळाला तेजस्विनीच्या आठवणींना उजाळा
2 शब्दांच्या पलिकडले : कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये…
3 ‘लोकांकिके’तील रावबाची चमकदार कामगिरी
Just Now!
X