X

Video : शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे थाटात आगमन

एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे.

लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतं. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच लग्नातील या धावपळीला आणि नवरोजींच्या स्वागताची लगबग दाखविणारं ‘नवरोजी’ हे  गाणं नुकतचं सोशल नेटवर्किंग साईटवर लॉन्च करण्यात आलं.

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी चित्रपटातील या गाण्याला मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलं असून याचं संगीत-दिग्दर्शन चिनार महेश यांनी केले आहे. तर जसराज जोशी आणि किर्ती किल्लेदार यांचा सुरेल आवाज या गाण्याला लाभला आहे.