19 October 2020

News Flash

शुभांगी अत्रे आता ‘भाभीजी’

‘निरागसता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टी शुभांगीकडे आहेत.

शिल्पा शिंदेची मालिकेतून हकालपट्टी

अंगुरी भाभीच्या भूमिकेने अभिनेत्री शिल्पा िशदेला नवी ओळख मिळवून दिली हे खरे असले तरी आता या मालिकेतून तिची कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिल्पा शिंदेवर वाहिनीने कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे, मात्र या सगळ्या घडामोडींमुळे मालिकेतून अंगुरी भाभीजी गायब झाली होती, आता ती शुभांगी अत्रेच्या रूपात दूरचित्रवाणीवर परतणार आहे.

‘भाभीजी घर पे है’ ही ‘अँड टीव्ही’ वाहिनीवरील मालिका अंगुरी भाभी या व्यक्तिरेखेमुळे जास्तच लोकप्रिय आहे. मात्र गेले काही दिवस याच अंगुरी भाभीच्या भूमिकेत काम करणाऱ्या शिल्पा िशदे या अभिनेत्रीमुळे ही मालिका चच्रेत आली होती. मालिकेच्या निर्मात्या बेनिफर कोहली यांनी शिल्पाऐवजी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिची या भूमिकेसाठी निवड केली आहे. शिल्पामुळे लोकप्रिय ठरलेल्या या भूमिकेत शुभांगीला प्रेक्षक स्वीकारतील का, या प्रश्नावर तिला थोडा वेळ द्यावा लागेल, पण ती नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकेल, असा विश्वास बेनिफर यांनी व्यक्त केला.

‘निरागसता आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टी शुभांगीकडे आहेत. ती खूप उत्तम अभिनेत्री आहे आणि लवकरच ती या शोमधून लोकांचे लक्ष वेधून घेईल’, असे बेनिफर यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 2:19 am

Web Title: shubhangi atre now working in angoori bhabhi serial
Next Stories
1 पुढच्या चित्रपटात सलमानसोबत दीपिका हा तर माध्यमांचा तर्क – कबीर खान
2 अंकुश ‘हॅशटॅग’चा ब्रँड अॅम्बेसिडर
3 ‘अझर’मधील ‘इतनी सी बात’ गाण्यात रिअल लाइफ लोकेशन्स
Just Now!
X