News Flash

शुभंकर तावडे दिसणार वेगळ्या अंदाजात

जाणून घ्या नेमकं काय..

सोशल मीडिया हा कलाकार आणि चाहत्यांना जोडणारा दुआ आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. कलाकार आपल्या चाहत्यांसांठी नेहमी सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करत असतात आणि चाहते देखील त्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. सध्या अभिनेता शुभंकर तावडे सोशल मीडियावर एका वेगळ्या अंदाजात चाहत्यांना पाहायला मिळत आहे. त्याचा हा वेगळा अवतार नक्की कशासाठी आहे हा प्रश्न अनेकांना पडला होता.

शुभंकर तावडे हा ‘टॉकीज कट्टा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमात मराठी कलाकारांशी शुभंकर गप्पा मारणार असून एक छान चर्चा त्यांच्यात रंगणार आहे.

‘टॉकीज कट्टा’ हा कार्यक्रम १८ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात शुभंकर टाईमपास आणि टाईमपास २ मधील कलाकारांशी गप्पा मारणार आहे. तेव्हा हा चॅट शो प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करणार आहे. शुभांकर प्रत्येक आठवड्यात अशाच काही कलाकारांसोबत चाहत्यांची भेट घडवून आणणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 1:33 pm

Web Title: shubhankar tawde going to host zee talkies katta avb 95
Next Stories
1 महेश मांजरेकरांच्या लेकीचा जिममधील डान्स व्हिडीओ व्हायरल
2 ‘लक्ष्यामामांचा फोन आला आणि..’, भरत जाधवची भावनिक पोस्ट
3 बिग बींना आवडला नाही केबीसीमध्ये विचारण्यात आलेला ‘हा’ प्रश्न
Just Now!
X