राज कपूर यांची मुलगी आणि श्वेता बच्चनच्या सासू रितू कपूर यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

‘रितू नंदा यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. त्यांना कर्करोग झाला होता. आम्ही सर्वजण दिल्लीत आहोत आणि दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’, अशी माहिती रितू नंदा यांचे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी दिली. नितू कपूर यांनी रितू यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली.

रितू यांचा जन्म १९४८ साली झाला होती. त्या उद्योजिका होत्या. उद्योगपती राजन नंदा यांच्याशी त्यांनी लग्न केलं होतं. राजन नंदा यांनी २०१८ साली अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा निखिल नंदाने अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनशी लग्न केलं. नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा यांच्या त्या आजी होत्या.