बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन नंदाने काही दिवसांपूर्वीच फॅशन विश्वात पाऊल ठेवलं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मोनिशा जयसिंगच्या साथीने श्वेताने ‘एमएक्सएस’ MXS हा ब्रँड लाँच केला. नव्याने सुरू झालेल्या श्वेताच्या या ब्रँडवर कॉपी केल्याचा आरोप होत आहे.

एक सप्टेंबर रोजी श्वेताचा ‘एमएक्सएस’ हा फॅशन ब्रँड मोठ्या दिमाखात लाँच झाला. लाँचिंगनंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी सोशल मीडियावर या ब्रँडचे हूडी घालून फोटोदेखील शेअर केले. मात्र फोटोतील हूडीवर असलेला फाँट पाहताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

वाचा : प्रियांका चोप्राचे आभार मानत सोनालीने शेअर केला नवा लूक

‘एमएक्सएस’ ब्रँडच्या हूडीवर ‘गर्ल पॉवर’ असं लिहिलं होतं. हा फाँट ‘पॉवरपफ गर्ल्स’ या गाजलेल्या कार्टूनमधील फाँटशी प्रचंड मिळताजुळता असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. तर एका अमेरिकन ब्रँडच्या स्वेटशर्टवरील फाँट आणि मजकुराचंही श्वेताच्या ब्रँडमधील कपड्यावरील मजकुराशी साधर्म्य असल्याचं काहींनी म्हटलं. त्यामुळे आता या आरोपांवर श्वेता काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.