News Flash

‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर श्वेता शिंदे मिस करते या व्यक्तीला

जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती

करोना व्हायसरमुळे अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता राज्य सरकारने मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियमावली आखण्यात आली आहे. या नियमांमुळे ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी सेटवर उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे श्वेता शिंदे त्यांना सेटवर मिस करत आहे.

‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत डॉक्टर मोनिका त्यांची आई डॉक्टर स्नेहलता (रोहिणी हट्टंगडी) यांना खूप मिस करत आहेत, असे दाखवण्यात येत आहे. याविषयी बोलताना, मोनिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणते की, ‘खरंतर मी देखील रोहिणी यांना सेटवर मिस करत आहे. त्या मनाने सर्वात तरुण अभिनेत्री आहेत. मात्र या नव्या नियमांनुसार त्या सेटवर येऊ शकत नाहीत.’

‘रोहिणी हट्टंगडी या सेटवर नेहमीच प्रसन्न आणि उत्साही असायच्या. म्हणूनच, केवळ या नव्या नियमामुळे त्यांना चित्रीकरणात सहभागी होता येत नसल्याने, सेटवर त्यांना सगळेच खूप मिस करत आहेत. लवकरात लवकर, करोनाचे संकट टळावे आणि सर्व काही सुरळीत व्हावे अशी इच्छा श्वेता  शिंदेने व्यक्त केली आहे. जेणेकरून, मनाने चिरतरुण असणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करता येईल आणि चित्रीकरणा दरम्यान भरपूर धमाल सुद्धा करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 3:30 pm

Web Title: shweta shinde missing this person on set of doctor don avb 95
Next Stories
1 Ctrl C + Ctrl V : संजय दत्तचा लूक छापल्याचा फोटो होतोय व्हायरल
2 “ही वेब सीरिज तुम्ही पाहाच”; विरेंद्र सेहवागने ‘अवरोध’वर केला कौतुकाचा वर्षाव
3 कार्तिकने सांगितला ‘दिल बेचारा’मधील आवडता सीन; दुसऱ्यांदा पाहणार चित्रपट
Just Now!
X