17 January 2021

News Flash

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी श्वेता शिंदे घेते अशी काळजी

तिची डॉक्टर डॉन ही मालिका १३ जुलै पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे ‘डॉक्टर डॉन.’ या मालिकेचे चित्रीकरण सुरु झाले असून सेटवर लगबग सुरु झाल्याचे दिसत आहे. १३ जुलै पासून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कोरोनाच्या संकटाचा विचार करता, योग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी श्वेता शिंदे विशेष काळजी घेत आहे.

श्वेता सेटवर विशेष काळजी घेत आहे. त्याविषयी बोलताना श्वेता म्हणाली “मीरारोड, ही अत्यंत गजबजलेली जागा आहे. या ‘रेड झोन’मध्ये चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मालिकेचे चित्रीकरण एका रिसॉर्टमध्ये सुरु आहे. मालिकेतील कलाकार व संपूर्ण टीम तिथेच राहते. कुणालाही बाहेरून आत येण्याची, अथवा बाहेर कुठेही जाण्याची परवानगी देण्यात येत नाही. आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, याचा विचार करून, सेटवरील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागत आहे.”

“मी सातत्याने थर्मास सोबत ठेवते. गरम पाणी पीत राहणं, वेळोवेळी सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं सुरु आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढेल यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मी करते आहे. चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार, नियमित व्यायाम या गोष्टी सुरु आहेत. माझा मेकअप मी स्वतःचा स्वतः करते आहे. माझी केशभूषा होण्याआधी त्यासाठी लागणार असलेली सर्व उपकरणं व्यवस्थित निर्जंतुक करण्यात येतात. मालिकेतील पोषाखासाठी वापरण्यात येणारे कपडे सुद्धा योग्यरीतीने निर्जंतुक करून मगच मी वापरते. या सर्व छोट्या गोष्टींची सवय नसल्यामुळे, सुरुवातीच्या काळात सगळंच थोडं कठीण वाटत आहे. मात्र यासगळ्याची सवय आम्ही हळूहळू करून घेत आहोत” असे तिने पुढे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 5:51 pm

Web Title: shweta shinde taking care of her health during coronavirus avb 95
Next Stories
1 ‘एखाद्या लेखकाने असा सीन लिहिला तर…’, स्वानंद किरकिरे यांनी विकास दुबे एन्काउंटरवर दिली प्रतिक्रिया
2 नेहा कक्करचा स्टेज परफॉर्मन्स पुन्हा एकदा चर्चेत
3 बॉलिवूडमधल्या गटबाजीमुळे माझे १४ चित्रपट रखडले- अध्ययन सुमन
Just Now!
X