छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हे नाव प्रेक्षकांसाठी नवीन राहिलेलं नाही. तिच्याच पावलावर पाऊल ठेवत तिची लेक पलकदेखील चाहत्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. बऱ्याच वेळा श्वेता पलकसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान श्वेताने पलकसोबतचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये दोघी माय-लेकी थिरकताना दिसत आहेत.

श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टास्टोरीवर तिचा आणि पलकचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत माय लेकी त्यांच्या नृत्यदिग्दर्शक आणि टीम सोबत डान्स आणि मस्ती करतांना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

Nothing but Sandy Skin and Summer Smiles! #etherealgirl @palaktiwarii

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

सध्या श्वेता ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत काम करत असून यात ती गुनीत सिक्का ही भूमिका साकारत आहे. या मालिकेमध्ये अभिनेता वरुण बडोलाने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. श्वेता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कसोटी जिंदगी की’, ‘नागिन’, ‘बाल वीर’ या मालिकांमध्ये तर ‘नच बलिये २’, ‘बिग बॉस ४’, ‘झलक दिखला जा ६’ या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली होती.