टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ४’ ची विजेती श्वेता तिवारी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती सतत तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आईप्रमाणेच श्वेताची मुलगी पलकही सध्या इन्स्टाग्रामवर फारच सक्रीय झाली आहे. पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. पलक अनेकदा सोशल मीडियावर चिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नुकताच तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये लोक पलकच्या ओठांवर कमेंट करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/BfNRBR3gMu2/

पलकने तिच्या फोटोशूटपैकी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या ओठांवर अधिक फोकस करण्यात आले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘बुटॉक्स लिप्स’. पलकला ही कमेंट अजिबात आवडली नाही. अशा प्रतिक्रियांना वेळीच आळा घालायला हवा यासाठी तिने त्या युझरला योग्य ते उत्तर देण्याचे ठरवले.

https://www.instagram.com/p/BfbEtlhgNj_/

पलक तिवारीने लिहिले की, ‘माझं वय फक्त १७ वर्ष आहे. जग मला कशा पद्धतीने पाहते आणि त्यांना कसं मला पाहायला आवडेल त्यानुसार मी बदलणार नाही. त्यामुळे मॅडम तुमच्या आरोपात तथ्य नाही. अशा पद्धतीचे आरोप लावणं सध्याची फॅशनच झाली आहे. माझ्यावर याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुमचा अपेक्षाभंग झाला असेल तर मला माफ करा.’

पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तारे जमीन पर’ स्टार दर्शील सफारीसह ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण अजूनपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

https://www.instagram.com/p/BhvtBsrFDQQ/