News Flash

पलक तिवारीने डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट; सोशल मीडियावर चर्चा

श्वेता आणि अभिनवचा वाद कारणीभूत?

अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आलीय. श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर विविध आरोप करत आहेत. श्वेतापासून विभक्त झाल्यापासून अभिनव मुलाच्या हक्कासाठी श्वेतावर आरोप करत आलाय. तर श्वेताने अभिनवच्या आरोपांचं खंडन करून अभिनववर प्रत्यारोप केले आहेत.

या सर्व वादानंतर आता श्वेताची मुलगी पलकने सोशल मीडियाला पाठ फिरवल्याचं दिसून येतंय. श्वेताची मुलगी पलक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती ग्लॅमरल फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. इन्स्टाग्रामवर पलकचे लाखो चाहते आहेत. मात्र सध्या चाहत्यांना पलकचं अकाऊंट शोधणं कठीण झालंय.कारण पलक तिवारीने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

दरम्यान, पलक तिवारीची आई म्हणजेच अभिनेत्री श्वेता तिवारी इन्स्टाग्रामवर पीटी नावाच्या एका अकाऊंटला फॉलो करत असून ते एक प्रायव्हेट अकाऊंट आहे. या युजरचं नाव पलक टी आहे. त्यामुळे हे अकाऊंट पलकचं असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. मात्र हे अकाऊंट नेमकं पलक तिवारीचं आहे का अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दुसरीकडे पलकने अकाऊंट डिटील का केलं ? असा प्रश्न नेटिझन्सकडून विचारला जातोय.  श्वेता आणि अभिनवच्या वादामुळे पलकने अकाऊंट डिलीट केल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.

पलक तिवारी लवकरच ‘रोजी- द सॅफ्रॉन चॅप्टर’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करतेय. २५ जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे. विशाल मिश्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा हॉरर सस्पेंस आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 1:40 pm

Web Title: shweta tiwari daughter palak tiwari delete instagram account kpw 89
Next Stories
1 पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला
2 आशुतोष यांनी पहिल्याच भेटीत केला कौतुकाचा वर्षाव; रेणुका शहाणेंची खास लव्हस्टोरी
3 प्रियांका चोप्राने सांगितले सुखी संसाराचे रहस्य ; म्हणाली, “फक्त दोनच वर्ष झाली आहेत लग्नाला म्हणून….”
Just Now!
X